लाच घेतल्याप्रकरणी रत्नागिरीत वरिष्ठ लिपिकाला शिक्षा, २०१४ मध्ये केली होती कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 20:48 IST2017-12-04T20:43:13+5:302017-12-04T20:48:37+5:30
रत्नागिरी : वडिलांच्या मृत्यूनंतर वारस म्हणून आईच्या नावे पेन्शन सुरू करण्यासाठीचे प्रमाणपत्र देण्यासाठी लाच घेतल्याप्रकरणी रत्नागिरीतील कोषागार कार्यालयातील वरिष्ठ लिपिकाला अटक

लाच घेतल्याप्रकरणी रत्नागिरीत वरिष्ठ लिपिकाला शिक्षा, २०१४ मध्ये केली होती कारवाई
रत्नागिरी : वडिलांच्या मृत्यूनंतर वारस म्हणून आईच्या नावे पेन्शन सुरू करण्यासाठीचे प्रमाणपत्र देण्यासाठी लाच घेतल्याप्रकरणी रत्नागिरीतील कोषागार कार्यालयातील वरिष्ठ लिपिकाला अटक करण्यात आली होती. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सुरेश नारायण चव्हाण (४०, रा. शासकीय निवासस्थान, आरोग्यमंदिर, रत्नागिरी) याला जिल्हा न्यायालयाने ४ वर्षे सक्तमजुरी व १० हजाराचा दंड ठोठावला आहे.
याप्रकरणी रत्नागिरीतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे तत्कालीन पोलीस निरीक्षक यांनी किरण तुकाराम उंडे यांनी १५ नोव्हेंबर २०१४ रोजी सापळा रचून सुरेश चव्हाण याला रंगेहाथ पकडले होते. या प्रकरणातील तक्रारदार यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर वारस म्हणून त्यांची आईचे नाव पेन्शन सुरू करण्यासाठी लाईफ टाईम एरियस प्रमाणपत्र देण्यासाठी ५ हजार रूपयांची लाच मागितली होती. ही लाच घेताना कोषागार कार्यालयाच्या आवारात १५ नोव्हेंबर २०१४ रोजी दुपारी १.३५ वाजण्याच्यादरम्याने लाचलुचपत पथकाने रंगेहाथ पकडले होते. याप्रकरणी शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश नागेश न्हावकर यांनी सुरेश चव्हाण याला दोषी ठरवून शिक्षा ठोठावली. सरकारी वकील म्हणून विनय गांधी यांनी काम पाहिले. तसेच खटल्याच्या कामात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस नाईक नंदकिशोर भागवत यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले.